बीडात रेल्वे आली रेss ट्रेन बघायला, सेल्फी अन् रील्ससाठी स्टेशनवर बीडकरांची गर्दी; व्यासपीठावर नेतेमंडळींची टोलेबाजी

Continues below advertisement

Beed railway pankaja munde

Continues below advertisement
1/7
आपल्या गावात जसं एसटी बस स्टँड असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, तसेच आपल्या गावात रेल्वे स्टेशनही असायला पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. दळणवळणाचा महत्त्वाचं साधन आणि देशाला जोडणारा मार्ग म्हणून भारतीय रेल्वेचे जगभर ख्याती आहे.
2/7
मराठावाड्यातील बीड जिल्हा या रेल्वेमार्गापासून वंचित होता. त्यामुळे, गेल्या तीन पिढ्यांपासून बीडमध्ये रेल्वेचं इंजिन धावावं, रेल्वेची शिट्टी वाजावी, रेल्वेनं बीडमध्ये उतरावं हे स्वप्न बीडकरांनी पाहिलं होतं. अखेर, हे स्वप्न सत्यात उतरलं आहे.
3/7
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत आज अहिल्यानगर ते बीड या रेल्वे लोहमार्गावर पहिली रेल्वे धावली. त्यामुळे बीडकरांचं स्वप्नांची पूर्तता झाल्याचा आनंद बीड रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला.
4/7
बीड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून बीडकरांनी नव्याने आलेली बीडची रेल्वे पाहण्यासाठी गर्दी केली होती. नव्या बीड रेल्वे स्थानकावर फोटो, व्हिडिओ काढण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची रीघ पाहायला मिळाली.
5/7
बीड जिल्ह्यात गेल्या 30 ते 35 वर्षांपासून रेल्वेची मागणी करण्यात येत होती, बीडच्या दिवंगत नेत्या आणि माजी खासदार केशर काकू क्षीरसागर यांनी बीड रेल्वेची मागणी केली होती. तर, दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
Continues below advertisement
6/7
बीड रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.
7/7
व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार धनंजय मुंडे हे शेजारीशेजारी बसल्याचं दिसून आलं. तर, आपल्या भाषणात पंकजा मुंडेंनी टोलेबाजी करत खासदार सोनवणेंना चिमटा लगावला.
Sponsored Links by Taboola