बीडकरांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास; बीड-परळी रेल्वे धावली, ग्रामस्थांकडून स्वागत, चेहऱ्यावर अत्यानंद

बीड जिल्ह्यात रेल्वे धावावी, बीडच्या नागरिकांनाही मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवास करता यावा हे स्वप्न दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होत. आता, ते स्वप्न सत्यात उतरत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. अमळनेर ते विघनवाडी नवीन रेल्वे लोहमार्गाची आज चाचणी घेण्यात आली. शिरूर कासार तालुक्यात विघनवाडीला रेल्वेचे आज आगमन झाले.

कुतूहलापोटी स्टेशनवर रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच रेल्वे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे तालुकावासियातर्फे नागरीकांनी मोटारमनचे स्वागत केले.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात असलेल्या व बिडपासून 30 किलोमीटर असलेली विघनवाडी पर्यंतच्या रेल्वेचं काम पूर्ण झाले व शुक्रवारी रेल्वे धावल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत चाचणी रेल्वेचे स्वागत केले.
विघनवाडी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी लपत नव्हता. आता, सर्वांना आतुरता आहे ती परळीपर्यंत ही रेल्वे पोहोचण्याची.
विशेष म्हणजे नगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात 275 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी सातत्याने येथील लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.
प्रदिर्घ काळापासून नगर बीड रेल्वेची चर्चा सुरू होती,काम सुरू झाल्यापासून कधी येणार रेल्वे याची उत्सुकता होती अखेर शुक्रवारी सकाळी अहिल्यानगर ते विघनवाडी असा टप्पा गाठला,रेल्वेची ट्रायल असली तरी आता लवकरच तीची सेवा सुरू होईल अशी आशा निर्माण झाली आहे.