Beed News : बीड शहरात खड्डेच-खड्डे, मनसेकडून रांगोळी काढून हटके आंदोलन
बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रांगोळी काढून आंदोलन केले आहे.
मनसेकडून करण्यात आलेल्या या आंदोलनातून नगरपालिका प्रशासनाचा विरोध करण्यात आला आहे.
अनेक वेळा मागणी करून देखील या रस्त्याचं काम होत नाही. तसेच, खड्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.
मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणारे अवजड वाहनं याच रस्त्यावरून प्रवास करतात त्यामुळे नागरिकांना आणि शाळकरी मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
अमरधाम स्मशानभूमी ते जालना रोडला जोडणारा रस्ता हा मोठया बाजार पेठेला जोडणारा प्रमुख रस्ता असून शहरातील नागरिकांनी शाळकरी मुलं देखील या रस्त्याचा वापर करतात.
मात्र, काही दिवसापासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढला असून, यामध्ये अनेकांचे जीव गेले आहेत.
त्यामुळे तात्काळ मुख्य रस्त्यापासून तर अमरधाम स्मशानभूमीपर्यंत या रस्त्याचं सिमेंट काँक्रीट करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.