मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बीडमध्ये कार्यकर्ते एकवटले, मनोज जरांगेंचे एक क्विंटल फुलांच्या हाराने स्वागत

मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेल्या मनोज जरांगेंचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी एक क्विंटल वजनाचा हार घालण्यात आला.

beed

1/7
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे .
2/7
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतिम इशारा सभेसाठी बीडच्या मांजरसुंबा परिसरात मराठा समाज बांधव यायला सुरुवात झाली आहे .
3/7
या सभेत सरकारकडून काय येणं अपेक्षित हे ठरणार आहे. सरकारने 27 तारखेपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा समाज थांबणार नाही.. असा इशारा या ठिकाणच्या मराठा समाजाने दिलाय.
4/7
राज्य सरकारने जरांगे पाटील यांचं भाषण कान उघडे ठेवून ऐकावं ही शेवटची संधी देत आहोत. तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुपारी ठेवून बडबड करणे थांबवावे असं देखील मराठा समाज म्हणत आहे..
5/7
दरम्यान, मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी बीडच्या मांजरसुबा येथे जोरदार तयारी करण्यात आलीय.
6/7
क्रेनच्या माध्यमातून एक क्विंटल फुलाच्या हाराने जरांगे पाटील यांचे स्वागत होईल. त्या नंतर महामार्गालगत निर्णायक बैठक होईल..
7/7
मुंबईला जाण्यापूर्वी होणाऱ्या बैठक आणि सभेतून जरांगे पाटील सरकारला अंतिम इशारा देणार आहेत. आणि याच साठी मोठ्या संख्येने मराठा समाज मांजरसुंबा येथे दाखल होत आहे
Sponsored Links by Taboola