बीडकरांसाठी पर्वणी! मे महिन्यातच कपिलधार धबधबा ओसंडून वाहू लागला, 100 फूटांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह कोसळू लागला, Photos

बीडच्या निसर्ग सौंदर्यात भर टाकणारा कपिलधारा येथील धबधबा देखील खळखळून वाहत आहे.

beed

1/7
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कपिलधार धबधब्याने यंदा सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.
2/7
गेल्या आठ दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या कपिलधारचा धबधबा प्रवाहित झाला आहे.
3/7
विशेष म्हणजे प्रथमच मे महिन्यातच हा धबधबा प्रवाहित झाल्याचे दिसून आल्याने कपिलधारा धबधब्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत.
4/7
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, यंदा मे महिन्यात तब्बल 119 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
5/7
विशेष म्हणजे, शुक्रवारी रात्री पडलेल्या 20 मिमी पावसामुळे कपिलधार येथील दोन्ही धबधबे प्रवाहित झालेत.
6/7
सध्या या धबधब्यातून शंभर फूटांहून अधिक उंचीवरून पाणी कोसळत आहे, आणि त्यामुळेच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
7/7
पर्यटनप्रेमींसाठी ही पर्वणी ठरत असून, कपिलधारने आधीच पावसाळ्याची चाहूल दिली आहे
Sponsored Links by Taboola