जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन, Citroen C5 Aircross भारतात लॉन्च
फ्रान्सची प्रसिद्ध वाहन उप्तादक कंपनी Citroen ने आपली नवीन Citroen C5 Aircross भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 36.67 लाख रुपये ठेवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कार फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीने अनेक नवीन आणि आधुनिक फीचर्स दिले आहेत.
Citroen C5 Aircross मध्ये कंपनीने बरेच अपडेट केले आहेत. यात ग्राहकांना नवीन डिझाइन पाहायला मिळेल. याला कंपनीचा नवीन लोगो देखील देण्यात आला आहे.
यात कंपनीचा नवीन V-shaped LED DRL देण्यात आला असून तो थ्रीडी लूक देतो. या कारमधील एलईडी व्हिजन हेडलाइट्स आणि ब्लॅक रंगातील ग्रील कारला अधिक आकर्षक बनवते. या कारच्या मागील बाजूस LED लाइट सिग्नेचर आणि 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात.
Citroen C5 Aircross च्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, यात 10-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12.3-इंचाचा डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.
या डिस्प्लेमध्ये 3 कस्टमाइझ करण्यायोग्य स्क्रीन देण्यात आल्या आहेत. ज्यात पर्सनल, डायल आणि रेगुलरचा समावेश आहे.
याच्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला ई-टॉगल गियर सिलेक्टर देण्यात आला आहे.
नवीन Citron C5 Aircross ला इलेक्ट्रिक सनरूफ, हँड्सफ्री इलेक्ट्रिक टेलगेट सारखे फीचर्स मिळतात. यात 580-लिटरची बूट स्पेस आहे.
जी 1630-लिटरपर्यंत वाढवता येते. यात पार्क असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, हिल डिसेंट असिस्ट, रिव्हर्स कॅमेरा, कीलेस एंट्री आणि स्टार्ट, हिल स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
Citroen C5 Aircross मध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 177 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क जनरते करते. याचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर, याची लांबी 4500 मिमी, रुंदी 1969 मिमी, उंची 1710 मिमी आणि व्हीलबेस 2730 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 230 मिमी आहे.