स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स, Volvo EX90 इलेक्ट्रिक कार भारतात होऊ शकते लॉन्च
Volvo ची नवीन EX90 चा खुलासा झाला आहे. ही कार XC90 लक्झरी SUV ची पूर्णपणे इलेक्ट्रिक रिप्लेसमेंट आहे. ही कार आधुनिक तंत्रज्ञानासह नवीन प्लॅटफॉर्म देखील वापरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन EX90 स्लीक हेडलॅम्प आणि स्लीकसह एक वेगळ्या लूकमध्ये येणार आहे. याची मागील बाजू पारंपारिक XC90 सारखीच आहे.
या इलेक्ट्रिक लक्झरी एसयूव्हीच्या आतील भागात, जबरदस्त इंटिरियर देण्यात आले आहे. तसेच याच्या केबिनमध्ये मोठ्या टचस्क्रीन देण्यात आली आहे.
नवीन कारमध्ये 14.5 इंचाची मोठी टचस्क्रीन दिली आहे. जी Google आधारित सेवांसह 5G ला सपोर्ट करते.
लक्झरी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 25-स्पीकर ऑडिओ सिस्टम, डोल्बी अॅटमॉससह बॉवर्स आणि विल्किन्स ऑडिओ सिस्टम हेडरेस्टमध्ये स्पीकर आहेत.
EX90 मध्ये ट्विन-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आहे. जे 111 kWh बॅटरीद्वारे समर्थित आहे आणि सुमारे 600km ची रेंज देते.
ग्राहक फक्त 30 मिनिटांत 0-80% पर्यंत बॅटरी फास्ट चार्ज करू शकता.
ग्राहक ही कार इतर डिव्हाइसेस किंवा इतर व्होल्वो EV चार्ज करण्यासाठी देखील वापरू शकता.
EX90 2024 मध्येही कार भारतात लॉन्च होऊ शकते.
या SUV चे उत्पादन 2023 मध्ये सुरू होईल. व्होल्वोने अलीकडेच XC40 रिचार्ज ईव्ही देखील लॉन्च केली आहे.