Voltrider Booty इलेक्ट्रिक सायकल भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय बाजारोएथित सध्या इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात आज अशी अनेक इलेक्ट्रिक दुचाकी आहे, जी चांगल्या रेंज आणि फीचर्ससह येते. मात्र आता बाजारात एक अशी इलेक्ट्रिक सायकल लॉन्च झाली आहे, जी फक्त 1 रुपयाच्या खर्चात 25 किमी धावते. या इलेक्ट्रिक सायकलचे नाव आहे 'बूटी'.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVoltrider या स्टार्टअप कंपनीने ही सायकल लॉन्च केली आहे. याची डिझाइन अशा प्रकारे करण्यात आली आहे की, यात सायकल आणि मोपेड दोन्हीची झलक दिसते. कंपनीने ही सायकल बूटी 120, बूटी 60 आणि बूटी 30 अशा तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
बूटी 120 हे टॉप मॉडेल ई-सायकल आहे. ज्यामध्ये कंपनीने 36 Ah बॅटरी पॅक वापरला आहे. यामध्ये रायडरला केवळ बॅटरीवर 90-100 किमी आणि पूर्ण चार्ज केल्यानंतर पेडल असिस्ट मोडवर 130 ते 150 किमीची रेंज मिळवू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीने Booty 120 ची किंमत 45,000 रुपये इतकी ठेवली आहे. Booty 60 बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 24 Ah ची लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. ही फक्त बॅटरीच्या पॉवरवर 55 ते 60 किलोमीटर धावू शकते.
तसेच पेडल असिस्ट फीचरच्या मदतीने ते 75 ते 80 किलोमीटरपर्यंत चालवता येते. ही ई-सायकल 37,000 रुपये किंमतीत बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बूटी 30 ही या रेंजमधील एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सायकल आहे. जी सर्वात कमी किमतीत 30,000 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही ई-सायकल केवळ बॅटरीच्या मदतीने 25 ते 30 किमीची रेंज देऊ शकते. तसेच पेडल असिस्ट मोडवर ही 45-50 किलोमीटरपर्यंत चालवले जाऊ शकते.
बूटी रेंजमधील सर्व इलेक्ट्रिक सायकलींची आसनक्षमता दोन आहे. प्रवाशाशिवाय ही इलेक्ट्रिक सायकल कुरिअर आणि डिलिव्हरीसाठी देखील वापरली जाऊ शकते.
कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक सायकल 25 किलोमीटर चालवण्यासाठी फक्त 1 रुपये खर्च येतो. त्यानुसार 100 रुपये प्रति महिना खर्च करून दररोज 100 किलोमीटर चालवता येईल.
दरम्यान, सामन्याच्या खिशाला परवडणारी अशी ही इलेक्ट्रिक सायकल आहे. याला बाजारात कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.