Best Electric Scooters: 'या' आहेत बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Electric scooter
1/6
Okinawa Praise Pro ही स्कूटर 87,593 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे आणि लिथियम आयन बॅटरीसह येते. पूर्ण चार्ज केल्यावर, ही स्कूटर स्पोर्ट्स मोडमध्ये 88 किमीची रेंज देते. Okinawa Praise Pro ची टॉप स्पीड 58 किमी/तास आहे.
2/6
ही हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आणि नोंदणी आवश्यक आहे. तुम्ही कंपनीच्या वेबसाइट किंवा डीलरशिपला भेट देऊन Okinawa Praise Pro बुक करू शकता. ऑनलाइन बुकिंगसाठी कंपनी 2,000 रुपये आकारते.
3/6
हिरो एडी ही कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ज्याला ऑपरेट करण्यासाठी नोंदणी आणि परवाना आवश्यक नाही. स्कूटर लिथियम आयन बॅटरीसह येते आणि पूर्ण चार्ज केल्यावर 85 किमीची रेंज देते. या स्कूटरची टॉप स्पीड 25 किमी/तास आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.
4/6
हिरो इलेक्ट्रिकच्या एडी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, अँटी Thief लॉक, फॉलो मी हेडलाइट, रिव्हर्स मोड, टेलिस्कोपिक सस्पेन्शन, यूएसबी पोर्ट अशी फीचर्स देण्यात आली आहेत. राइडचा दर्जा सुधारण्यासाठी यात रुंद सीट आणि मोठे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हिरो एडीला 72,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
5/6
जर तुम्ही उत्तम रेंज असलेली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hero Optima CX हा एक चांगला पर्याय आहे. ही स्कूटर 62,190 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत उपलब्ध आहे.
6/6
Hero Optima CX सिंगल बॅटरी आणि ड्युअल बॅटरी मॉडेल्समध्ये येतो. ड्युअल बॅटरी मॉडेलची रेंज 140 किमी आहे. ही स्कूटर 45 किमी / ताशी वेगाने धावू शकते. याची ड्युअल लिथियम-आयन बॅटरी 4-5 तासांत पूर्ण चार्ज होते.
Published at : 18 Jun 2022 11:25 PM (IST)