Tata Cars Offer : सणासुदीच्या काळात टाटाकडून ग्राहकांना दिवाळी भेट! 'या' कारवर मिळतेय भरघोस सूट
टाटा मोटर्सने सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांचा आनंद वाढविण्यासाठी एक योजना तयार केली आहे. त्यामुळेच कंपनी कारवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर देत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सणासुदीच्या डिस्काऊंट ऑफर अंतर्गत, TATA ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांसारखे फायदे मिळतील. कोणत्या कारमध्ये किती डिस्काऊंट मिळतेय हे जाणून घ्या.
Tata Nexon : Tata एकूण ₹20,000 ची सूट देत आहे ज्यामध्ये ₹15,000 चा एक्सचेंज बोनस आणि ₹5,000 चा कॉर्पोरेट डिस्काउंट या सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV च्या डिझेल प्रकारावर आहे. तर त्याच्या पेट्रोल व्हेरियंटवर ₹ 3,000 ची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.
टाटा टिगोर : टाटा आपल्या टिगोरवर 23,000 पर्यंत सूट देत आहे. या अंतर्गत, या कारच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 3,000 चा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 10,000 चा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय, कंपनी XZ आणि XZ+ प्रकारांवर 10,000 रूपयांची रोख सवलत, एक्सचेंज बोनस म्हणून 10,000 आणि XZ आणि XZ+ प्रकारांवर 3,000 रूपये कॉर्पोरेट ऑफर देत आहे.
Tata Tiago : कंपनी Tata Tiago वर एकूण 23,000 पर्यंत सूट देत आहे. कंपनी तिच्या XE आणि XT प्रकारांवर 10,000 चा एक्सचेंज बोनस आणि 3,000 ची कॉर्पोरेट सूट देत आहे.
XZ+ व्हेरिएंटमध्ये 10,000 रूपयांची रोख सवलत आणि कॉर्पोरेट सवलत म्हणून 3,000 रूपयांची सूट मिळत आहे.
टाटा हॅरियर आणि सफारी : टाटा या दोन प्रीमियम SUV वर 40,000 रूपयांपर्यंत सूट देत आहे. त्यांची एक्स-शोरूम किंमत 15.34 लाख ते 23.5 लाख रुपये आहे.