Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सची नवी ईव्ही एसयूव्हीची, पाहा भन्नाट लूक
Tata Avinya Electric SUV : देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनीने टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या 'टाटा अविन्या' (Tata Avinya) या नव्या एसयूव्हीची पहिली झलक भारतात लाँच केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कार टाटा मोटर्सच्या तिसऱ्या पिढीतील आर्किटेक्चर 'बॉर्न इलेक्ट्रिक'वर आधारीत पहिलं मॉडेल आहे.
टाटा मोटर्सनं सांगितलं आहे की ही कार ADAS सारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये सह येईल. नवीन आर्किटेक्चरमुळे या कारला केबिनसाठी अधिक जागा मिळणार आहे.
'टाटा अविन्या' खास भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आली आहे. मात्र, ही कार जागतिक बाजारातही विकली जाईल, असे टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं आहे.
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी या कॉन्सेप्ट कारच्या नावाबद्दल सांगितले की, 'अविन्या' हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द असून त्याचा अर्थ नावीन्य असा होतो. तसेच या नावात IN देखील येतो. जी भारताची ओळख आहे.
टाटा अवन्याचे डिझाईन खूपच भविष्यवादी बनवण्यात आले आहे. ते साधे आणि मिनिमलिस्टिक ठेवण्यात आले आहे.
कारच्या स्टीयरिंग व्हीलवर टच पॅनेल देण्यात आले आहे आणि यावरून कारची सर्व वैशिष्ट्ये नियंत्रित केली जातात यावरून त्याची किमानता मोजली जाऊ शकते.
कारचा डॅशबोर्ड प्रत्यक्षात एक संपूर्ण साउंड बार आहे. प्रत्येक प्रवाशाच्या हेडरेस्टवर स्पीकर देण्यात आले आहेत, जेणेकरून गाणी ऐकताना सुंदर वैयक्तिक अनुभव घेता येईल.
टाटा मोटर्सने सांगितले की, ही कार कंपनीच्या Gen 3 आर्किटेक्चरवर आधारित इलेक्ट्रिक कार आहे.
ही कार नव्या युगातील तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज आहे. कंपनीने सांगितले की, टाटा अविन्या ईव्ही 2025 पर्यंत बाजारात दाखल होईल.
कारच्या आतही भरपूर जागा आहे. ड्रायव्हरची 360 डिग्री गोल फिरू शकते. कारचा डॅशबोर्ड (Tata AVINYA) देखील खूपच आकर्षक दिसत आहे.