Tata Altroz DCA : टाटाची नवीन Tata Altroz DCA ऑटोमॅटिक कार लवकरच बाजारात उपलब्ध होणार, वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Tata Altroz DCA
1/5
अल्ट्रोझ त्याचे लुक, हाय सिक्युरिटी रेटिंग आणि value पोझिशनिंगमुळे यशस्वी झाली आहे. तर, आता ऑटोमॅटिक त्याचे आकर्षण आणखी वाढवणार आहे. या कारचा ड्रायव्हिंग अनुभव सांगण्यापूर्वी आपण त्याच्या फीचर्स जाणून घेऊयात. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे Altroz DCA ला ड्युअल क्लच ऑटोमॅटिक मिळतो आणि ते फक्त 86 bhp 1.2L पेट्रोलसह ऑप्शन म्हणून दिले जाते.
2/5
ड्युअल क्लच ऑटोमॅटिकने मंद गतीने चालवताना खरोखरच चांगली कामगिरी केली. कारण या कारचे इंजिन जास्त पॉवरफुल आहे. Altroz मॅन्युअल 1.2l मानकाला काही डाउनशिफ्ट्स आवश्यक आहेत.
3/5
ड्युअल क्लच ड्रायव्हिंग सुरळीत आणि अधिक आरामदायी बनवते. Altroz DCA शहरात दैनंदिन व्यवहारात ड्रायव्हिंग करण्यासाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे मोठमोठ्या महामार्गांवर देखील Altroz DCA ने उत्तम प्रतिसाद दिला आहे.
4/5
एक महत्त्वाचा घटक ज्याचा आपण उल्लेख करणे आवश्यक आहे तो म्हणजे Altroz DCA व्हॅट क्लच वापरते आणि ते कोरड्या क्लचपेक्षा अधिक विश्वासार्ह बनवते. तसेच तुम्हाला गरम होण्याच्या समस्येपासूनही ही कार तुम्हाला दूर ठेवते. या कारचा आतापर्यंत प्रवास करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ट्रॅफिकमध्ये देखील ही कार तुम्हाला उष्णतेचा अनुभव देत नाही.
5/5
नवीन ऑपेरा ब्लू कलर अल्ट्रोझला अधिक आकर्षक बनवते. XM+, XT, XZ आणि XZ+ प्रकारांमध्ये उपलब्ध, Altroz DCA ची किंमत मॅन्युअलपेक्षा सुमारे 1 लाख रुपये किंवा अधिक आहे. तुम्हाला जर या उन्हाळ्यात एखादी नवीन कार घ्यायची असेल. जी तुम्हाला आरामदायी अनुभव देईल तर Altroz DCA तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल हे मात्र नक्की.
Published at : 30 Mar 2022 07:12 PM (IST)