Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सनरूफसह आहे जबरदस्त इंजिन, अशी आहे नवीन Maruti Suzuki Brezza
देशात मारुती सुझुकी आपल्या आकाराने लहान गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र आता कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्येही आपला ठसा उमटवला आहे. कंपनीने नुकतीच आपली नवीन अपडेटेड Brezza एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीची ही कार आधी Vitara Brezza म्हणून ओळखली जात होती. मात्र यातून आता Vitara हे नाव वेगळे करण्यात आले असून नवीन कार आता फक्त Brezza म्हणून ओळखली जाणार आहे. याच कारबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन ब्रेझा आकाराने मोठी आहे. याच्या डिझाइनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ऑल-न्यू मारुती सुझुकी ब्रेझाची पुढील बाजू जुन्या मॉडेलच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी दिसते. यात नवीन LED DRLs आणि ग्रील देण्यात आली आहे. जी पाहताच तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडेल. याचा नवीन हेडलॅम्प सेटअप तुमचं लक्ष वेधून घेईल. याचा नवीन बंपर खूप उठून दिसतो. मात्र याचे फॉग लॅम्प आकाराने लहान आहेत.
यातील Suzuki चा लोगो खूपच आकर्षक वाटतो. यात ड्युअल-टोन डायमंड-कट 16-इंच अलॉय व्हील्स आहेत. लोअर व्हेरियंट पेंट केलेल्या व्हील्ससह उपलब्ध आहेत आणि बेस व्हेरिएंट स्टीलच्या व्हील्ससह उपलब्ध आहेत. नवीन ब्रेझा आकाराने मोठी आहे. यातील नवीन ड्युअल-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स ब्रेझाला आता अधिक आधुनिक बनवतात. मागील ब्रेझाच्या तुलनेत नवीन ब्रेझामध्ये स्लिम एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहे.
फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर, यात नवीन 9-इंच टचस्क्रीन वापरण्यास सोपी आहे. याचा आयकॉन/बेसिक डिस्प्ले दिसायला छान आहे. यात कनेक्टेड कार टेक, Arkamys ऑडिओ सिस्टम, वायरलेस चार्जिंग आणि एक सनरूफ देखील आहे. नवीन ब्रेझा ही पहिली मारुती कार आहे ज्यात सनरूफ देण्यात आले आहे. हा फीचर्स भारतातील अनेक ग्राहकांना आवडतो.
यात ऑटो हेडलॅम्प, A आणि C प्रकारचे USB फास्ट चार्जिंग पोर्ट, 6 एअरबॅग्ज, ESC, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि बरेच फीचर्स मिळतात. याचा लेगरूम चांगला असून ही एक आरामदायी कार आहे. या कारची मागील बाजू सर्वात रुंद वाटते, ज्यात तीन प्रवासी बसू शकतात.
Brezza 103 bhp आणि 137Nm सह 1.5l K-सिरीज ड्युअल जेट पेट्रोल इंजिनच्या सिंगल इंजिन पर्यायासह येते. स्टँडर्ड हे नेहमीप्रमाणे 5-स्पीड मॅन्युअल आहे. परंतु पॅडल शिफ्टर्ससह नवीन 6-स्पीड ऑटोमॅटिक जाणून घेण्यासाठी तुम्ही येथे आहात. याचा गॉन जुना 4-स्पीड ऑटोमॅटिक आहे. हा नवीन गिअरबॉक्स खूप आधुनिक आहे. यामुळेच ही नवीन Brezza 1.5l आता चालवणे अधिक सोपे होते. याचा ग्राउंड क्लीयरन्सही चांगला आहे. ज्यामुळे ही कार तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात आरामात चालू शकता.