131 ची जबरदस्त रेंज, कमी किंमत आणि दमदार फीचर्स; Ola S1 EV लॉन्च
Ola Electric ने Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्कूटर 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. स्कूटरवर FAME-2 इलेक्ट्रिक वाहन सबसिडी लागू झाल्यास याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. कंपनीने Ola S1 ई-स्कूटरची 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली आहे. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवरून ही स्कूटर बुक केली जाऊ शकते (https://book.olaelectric.com/).
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुकिंग केल्यानंतर 2 सप्टेंबरपासून ही स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येईल. कंपनी 7 सप्टेंबरपासून स्कूटरची होम डिलिव्हरी सुरू करणार आहे. Ola S1 Ola S1 Pro चे हाय रेंज मॉडेल भारतीय बाजारात आधीच उपलब्ध आहे. कंपनी फक्त 2,999 रुपये प्रति महिना EMI वर स्कूटर खरेदी करणाऱ्यांना देत आहे.
डिझाइनच्या बाबतीत Ola S1 S1 Pro सारखीच दिसते आणि या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. Ola S1 चे S1 Pro सारखेच स्लीक बॉडी आहे. याशिवाय जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम आणि निओ मिंट या पाच रंगांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
कंपनीचा दावा आहे की, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ARAI प्रमाणित रेंज 131 किमी आहे. साधारणपणे रस्त्यावर ही स्कूटर 128 किमीची रेंज सहज देऊ शकते. S1 प्रो प्रमाणेच S1 चालवण्याची मजा येईल असे ओलाचे म्हणणे आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, S1 Pro ची टॉप स्पीड 95 किमी/तास आहे. ज्यामुळे ही स्कूटर हायवेवर देखील सहज चालवता येते. ही स्कूटर केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.
Ola S1 स्कूटरमध्ये MoveOS 3 ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या अपडेटमध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आहेत. MoovOS 3 अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.