Photo: स्कोडा कुशाक आहे देशातली सर्वात सुरक्षित कार, या एसयूव्हींनाही मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
फोक्सवॅगन टिगुआन (Volkswagen Tiguan) आणि स्कोडा कुशाक (skoda kushaq) यांना ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट सेफ्टी 29.64/34 गुण आणि चाईल्ड सेफ्टी 42/49 गुणांसह 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया दोन्ही एसयूव्ही कारचे बॉडीशेल्स अतिशय मजबूत असल्याचे आढळून आले.
यात ड्युअल एअरबॅग्ज, ESC, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, थ्री-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम यांसारखी सेफ्टी फीचर्स देखील आहेत.
महिंद्राच्या नवीन SUV Scorpio-N ने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट सेफ्टीत 29.25/34 गुणांसह 5 स्टार आणि चाईल्ड सेफ्टीत 28.93/49 गुणांसह 3 स्टार मिळवले आहे.
कारला बॉडीशेल इंटिग्रिटीसाठी स्थिर रेटिंग देण्यात आली होती, ज्यामुळे ती सर्वात सुरक्षित बॉडी-ऑन-फ्रेम एसयूव्ही बनते.
image यासोबतच 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 4 डिस्क ब्रेक्स, EBD सह ABS, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, हिल होल्ड असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यासारखी सेफ्टी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये टाटा पंचने (Tata Punch) अॅडल्ट सेफ्टीमध्ये 17 पैकी 16.45 गुणांसह 5 स्टार आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 40.89 गुणांसह 4 स्टार मिळवले आहेत.
टाटा पंचमध्ये ड्युअल फ्रंटल एअरबॅग्ज, EBD सह ABS, ब्रेक स्वे कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर्स आहे.
तसेच यात रिअर-व्ह्यू कॅमेरा यांसारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.