SEAT Mo 50 Electric Scooter लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत आहे. हे पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने नवीन फीचर्ससह बाजारात आणत आहेत. यातच आता स्पॅनिश कार उत्पादक SEAT ने Mo 50 'एंट्री-लेव्हल' इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही इलेक्ट्रिक स्कूटर शॉर्ट राइडच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
SEAT Mo 50 ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Mo 125 होती, जी या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 5.6 kWh ची बॅटरी आणि 7.3 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे.
ही मोटर 9.7 bhp पॉवर देते. SEAT चा दावा आहे की Mo 50 ची कमाल रेंज पूर्ण चार्ज केल्यावर 172 किमी आहे.
राइडिंगसाठी, ग्राहकांना सिटी, स्पोर्ट आणि इको असे 3 मोड मिळतात.
यात मागील बाजूस प्री-लोडेड अॅडजस्टेबल मोनोशॉक आणि समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
सध्या कंपनीने या पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही.
SEAT Mo 50 इलेक्ट्रिक स्कूटर 2023 च्या पहिल्या सहामाहीत भारतात लॉन्च केली जाऊ शकते.
भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्यावर, ई-स्कूटर टीव्हीएस iQube, बजाज चेतक, Ola S1 आणि Ather 450X सारख्यांना स्पर्धा करेल.