देखणीच नाही जबरदस्त आहे 'ही' बाईक, पाहा फोटो
देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड भारतात आपली ऑल न्यू Scram 411 बाईक लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही बाईक म्हणजे हिमालयन बाईकचीच लहान बहीण, असं ही आपण याला म्हणू शकतो. ही बाईक हिमालयन बाईकवरच आधारित आहे.
Himalayan ही एक प्रॉपर ऍडव्हेंचर बाईक आहे, तर Scram 411 ही डेली युजसाठी परफेक्ट अशी बाईक आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
Royal Enfield ने ही बाईक एकूण सात रंगांमध्ये सादर केली आहे. यात व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो रंगाचा समावेश आहेत.
नवीन Scrum 411 मध्ये 411cc सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे RE हिमालयालामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. हे इंजिन 24.3 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते.
कंपनीने भारतीय बाजारात याची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये ठेवली आहे.