Rolls-Royce Electric Car : Rolls-Royce ची इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च; पाहा फोटो
सध्या इलेक्ट्रिक वाहनांची (Elcetric Vehicle) मागणी वाढत चालली आहे. दुचाकी वाहनापासून ते चारचाकी वाहनापर्यंत सगळेच इलेक्ट्रिक वाहन बनवण्याच्या तयारीत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन आता ब्रिटनची आलिशान लक्झरी कार निर्माता कंपनी रोल्स रॉयसही (Rolls-Royce) इलेक्ट्रिक कारच्या बाजारात पदार्पण केले आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत पारंपरिक इंधन कार बनवणाऱ्या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार सार्वजनिक केली आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये नेमके कोणते फिचर्स असणार आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जगभरातील खास लोकांची पसंती असलेली रोल्स रॉयस (Rolls-Royce)आता इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. कंपनीने स्पेक्टर (Spcetor) नावाची पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे.
कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये आतापर्यंतची सर्वात रुंद ग्रिल दिली आहे. यासोबतच, यात स्प्लिट हेडलॅम्प डिझाईन, हेडलॅम्प क्लस्टर, हाय माउंटेड अल्ट्रा स्लिम एलईडी डीआरएलसह 23-इंच चाके आहेत.
लक्झरी कार सोबतच बॅटरीचीही काळजी घेण्यात आली आहे. या कारची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 25 लाख किलोमीटर चालवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये बसवलेल्या मोटरमधून 585 bhp आणि 900 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 520 किमीपर्यंत चालवता येईल. या कारला शून्यातून 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी फक्त 4.5 सेकंद लागतात.
दोन दरवाजे असलेली ही इलेक्ट्रिक कूप स्टाईल कार उपलब्ध करून देताना एरोडायनॅमिक्सचीही काळजी घेण्यात आली आहे.
या इलेक्ट्रिक कारच्या लॉन्चिंगबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, Rolls-Royce ची इलेक्ट्रिक कार पुढील वर्षी 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते.