पॉवरफुल इंजिन, आधुनिक फीचर्स; नवीन मारुती Alto K10 लॉन्च
maruti suzuki alto k10
1/8
आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली बहुप्रतीक्षित Alto K10 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार आपल्या Heartect प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन अल्टो ही अधिक आधुनिक आहे.
2/8
कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. भारत सर्वाधिक विक्री होणाऱ्या या कारचे नवीन व्हर्जन दिसायला खूप स्पोर्टी आणि आकर्षक आहे.
3/8
कंपनीच्या या नवीन कारमध्ये ऑटो गियर शिफ्ट, स्मार्ट प्ले स्टुडिओ, 4 स्पीकर्स, डिजिटल स्पीडोमीटर, कीलेस एंट्री, 1.0 लिटर इंजिन, इंजिन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सारखे फीचर्स देण्यात आले आहे. याशिवाय यात गियर शिफ्टिंगसह 15 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये बॅक कॅमेरा आणि दोन एअरबॅग्ज ही देण्यात आले आहे.
4/8
2022 Maruti Suzuki Alto K10 मध्ये ऑल पॉवर विंडो, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVM, मॅन्युअल एअर कंडिशनिंग, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑल ब्लॅक इंटीरियर, विविध प्रकारांमध्ये काही फीचर्स यात देण्यात आले आहेत.
5/8
मॉडेल आणि किंमत: STD- 3.99 लाख रुपये, LXI- 4.82 लाख रुपये, LXI- 4.82 लाख रुपये, VXI- 4.99 लाख रुपये, VXI+ - 5.33 लाख रुपये.
6/8
2022 Alto K10 मध्ये 1.0L K10C ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 67 hp ची पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क जनरेट करते.
7/8
नवीन Alto K10 मध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
8/8
ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून नवीन Alto K10 ऑनलाइन किंवा डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, कंपनी 22 वर्षांपासून दर तासाला 100 अल्टोची विक्री करत आहे. यामुळे देशातील ऑटोमोबाईल क्षेत्र बदलले आहे.
Published at : 18 Aug 2022 07:50 PM (IST)
Tags :
Maruti Suzuki Maruti Maruti Suzuki Alto KW *Alto Alto K10 Price Alto K10 Specs Alto K10 Features Alto K10 Engine Alto K10 Review Alto K10 Variants Maruti Suzuki Alto K10 2022 Maruti Suzuki Alto K10 Maruti Suzuki Alto K10 In India Maruti Suzuki New Alto Launch Maruti Suzuki Alto K10 2022 Launch In India Maruti Suzuki New Alto 2022*