PHOTO : पाच टॉप फीचर्ससह लॉन्च होणार कियाची 7 सीटर कारेन्स

किया कार कंपनीची नवी कारेन्स उद्या लॉन्च होत आहे. किया कारेन्स (Kia Carnes) ही एक सात सीटर एसयुव्ही आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कियाची ही कारेन्स दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल पॉवरट्रेनसह 6-7 सीटर ले-आउटमध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस फिचर्ससह ही कार बाजारात येत आहे.

कारेन्सच्या वैशिष्ट्यांमध्ये 66 कनेक्टेड कारसह 26.03 cm (10.25) HD टचस्क्रीन नेव्हिगेशन, 8-स्पीकर बोस ऑडीओ सिस्टीम, व्हायरस आणि बॅक्टेरिया संरक्षणासह स्मार्ट शुद्ध हवा प्युरिफायर आणि हवेशीर फ्रंट सीटचा समावेश आहे.
कारेन्समधील टच इलेक्ट्रिक फोल्डिंग सीट यंत्रणा हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या फिचर्समुळे केवळ एक बटण दाबाल्यानंतर सीट दुमडल्या जातील. त्यामुळे अगदी सहज पद्धतीने कारच्या आत-बाहेर जाता येणार आहे. शिवाय कारच्या आतील जागाही खूप आहे.
कियाच्या या कारमध्ये स्मार्टस्ट्रीम 1.5 लिटर पेट्रोल, स्मार्टस्ट्रीम 1.4 लिटर टी-जीडीआय पेट्रोल आणि 1.5 लिटर सीआरडीआई वीजीटी डिझेल पर्यायासह 6MT, 7DCT आणि 6AT तीन ट्रान्समिशचा समावेश आहे.
टर्बो पेट्रोलला DCT पर्याय मिळेल तर डिझेलमध्ये टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ऑफर असेल. केरेन्स टोयोटा इनोवा, क्रिस्टा आणि ह्युंदाईच्या अल्काजरला टक्कर देत आहे.
लूकचा विचार केला तर कॅरेन्सचा पुढील भाग खूपच आकर्षक आहे. त्यामध्ये हेडलॅम्प आणि डीआरएल वेगळे केले आहेत