Parineeti chopra Car Collection: परिणीती चोप्राला 'या' आलिशान कारची आवड, पाहा फोटो
Parineeti chopra Car Collection: जर तुम्ही देखील परिणीती चोप्राचे चाहते असाल आणि तिच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल, तर पाहा तिचे कार कलेक्शन...
Parineeti Chopra
1/4
या यादीत पहिले नाव आहे Jaguar XJL लक्झरी कारचे. ही 5 सीटर कार आहे, जी डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांसह विकली जात होती. या आलिशान कारची किंमत 99.01 लाख ते 1.11 कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, आता हे मॉडेल बंद करण्यात आले आहे.
2/4
दुसरी लक्झरी कार ऑडी Q7 (Audi Q7) आहे. ही 7 सीटर एसयूव्ही कार आहे, ज्यामध्ये 2995 सीसी इंजिन उपलब्ध आहे. दुसरीकडे, त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 84.70 लाख रुपयांपासून सुरू होते. ह्या कारचे तीन प्रकारचे मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत.
3/4
पुढील लक्झरी कार लँड रोव्हर रेंज रोव्हर वॉग आहे. ज्याची किंमत 2.39 कोटी रुपयांपासून सुरू होते. ही 5 सीटर एसयूव्ही कार आहे. ही कार 50 मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. त्याचा टॉप स्पीड 225-250 किमी प्रतितास आहे. ही कार पेट्रोल, डिझेल आणि हायब्रीड पर्यायांसह खरेदी केले जाऊ शकते.
4/4
चौथी कार ऑडीची Q4 ई-ट्रॉन एसयूव्ही आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.01 कोटी रुपये आहे. त्याचा टॉप स्पीड 160 किमी प्रतितास आहे, या कारची ड्रायव्हिंग रेंज 405 किमीपर्यंत आहे, पॉवर पॅक 150 kWh आहे.
Published at : 14 May 2023 10:30 PM (IST)