नवीन लूक, जबरदस्त फीचर्स; नवीन Honda Dio स्पोर्ट्स लॉन्च
honda dio sports
1/6
दुचाकी निर्माता कंपनी होंडाने आपली नवीन डिओ स्पोर्ट्स स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत 68,317 रुपये ठेवली आहे. कंपनीने Dio Sport ला स्टँडर्ड आणि डिलक्स या दोन प्रकारांच्या पर्यायामध्ये लॉन्च केले आहे. ज्यामध्ये दोन रंगांचे पर्याय दिले आहेत.
2/6
Honda Dio Sport एक स्पोर्टी आणि आकर्षक डिझाइनसह येते. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर युनिसेक्स ग्राहकांना आकर्षित करेल.
3/6
होंडा डिओ स्पोर्ट्स कंपनीच्या रेड विंग डीलरशिपद्वारे किंवा ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात. या स्कूटरला नवीन डिझाइन केलेले ग्राफिक्स आणि स्पोर्टी रेड रिअर सस्पेंशन देण्यात आले आहे.
4/6
ही स्कूटर ब्लॅकसह स्ट्रॉन्टियम सिल्व्हर मेटॅलिक आणि ब्लॅकसह स्पोर्ट्स रेड रंग पर्यायात उपलब्ध आहे. हे रंग पर्याय दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
5/6
होंडा डिओ स्पोर्ट्सला अधिक स्पोर्टी लूक देण्यासाठी फायटिंग रेड रिअर कुशन स्प्रिंग देण्यात आले असून त्याच्या डीलक्स व्हेरियंटमध्ये स्पोर्टी अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
6/6
या स्कूटरला फ्रंट पॉकेट आहे, जो स्टोरेजसाठी खूप उपयुक्त आहे. कंपनीने याच्या डीलक्स व्हेरिएंटची किंमत 73,317 रुपये ठेवली आहे.
Published at : 03 Aug 2022 11:43 PM (IST)