Honda City hybrid : 26.5kmpl मायलेजसह जाणून घ्या HEV बद्दलची काही खास वैशिष्ट्ये

Honda Hybrid Car

1/5
जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा कार इंडियाने भारतात आपली नवीन Honda City e: HEV Hybrid सादर केली आहे. होंडा सिटी हायब्रिड ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी मिड-साईझ सेडान बनली आहे. या कारच्या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
2/5
ही एक मजबूत हायब्रीड कार आहे. ज्याचा अर्थ City e : HEV मध्ये 1.5l पेट्रोल इंजिनला जोडलेल्या दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. या कारमध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिनसह, दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. हे EV मोडमध्ये बॅटरी वापरून मोटरद्वारे चालवले जाते. ईव्ही ड्राइव्ह मोड, हायब्रिड ड्राइव्ह मोड आणि इंजिन ड्राइव्ह हे इतर मोड आहेत.
3/5
इलेक्ट्रिक कारच्या व्यतिरिक्त सिटी ई : एचईव्ही हे सेल्फ चार्जिंग आहे म्हणजे स्वतः चार्ज करण्याची गरज नाही. ब्रेकिंगद्वारे विद्युत ऊर्जा लिथियम आयन बॅटरी पॅक स्व-चार्ज करते. डिसेलेरेशन पॅडल सिलेक्टर देखील आहे.
4/5
स्टँडर्ड 3 वर्षांच्या वॉरंटी व्यतिरिक्त, सिटी e:HEV त्याच्या लिथियम-आयन बॅटरी पॅक किंवा 1,60,000 किमीसाठी 8 वर्षांच्या वॉरंटीसह येईल. इतर वैशिष्ट्यांमध्ये फुल एलईडी हेडलॅम्प, सिटी हायब्रीडसाठी नवीन TFT डिस्प्ले, ऑटो पार्किंग ब्रेक, अॅम्बियंट लाइटिंग, सनरूफ, 6 एअरबॅग्ज, रियर व्ह्यू कॅमेरा, होंडा लेन वॉच आणि बरेच काही समाविष्ट आहे.
5/5
सिटी हायब्रिडला Honda Connect आणि स्मार्टवॉच इंटिग्रेशनसह 8-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. या कारच्या केबिनभोवती 8 स्पीकर देखील आहेत. ड्रायव्हर डिस्प्ले पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्यात ऑटो लॉक सिस्टिम आहे.
Sponsored Links by Taboola