जेम्स बॉण्डही वापरतो या कंपनीची कार, नवीन Aston Martin DBX 707 भारतात लॉन्च
इंग्लंडची प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी अॅस्टन मार्टिन (Aston Martin) आपल्या स्पोर्ट्स कारसाठी (Sports Car) जगभरात प्रसिद्ध आहे. अॅस्टन मार्टिनच्या कार फक्त दिसायला देखण्या नाही तर पॉवरफुल ही असतात. तरुणांमध्ये या कारची वेगळीच क्रेज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेम्स बॉण्डच्या अनेक चित्रपटांमध्ये अॅस्टन मार्टिच्या कार वापरण्यात आल्या आहेत. मग तो सत्तरीच्या दशकातील जेम्स बॉण्डचा (James Bond) चित्रपट असो, की अलीकडेच प्रदर्शित झालेला 'नो टाइम टू डाय' (No Time To Die) हा चित्रपट असो. जेम्स बॉण्डची कार म्हणूनही अॅस्टन मार्टिची कार ओळखली जाते.
कंपनीने आपली नवीन दमदार SUV DBX 707 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची किंमत 4.63 कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वात महागडे मॉडेल आहे. चला तर जाणून घेऊ, काय खास आहे या कारमध्ये...
अॅस्टन मार्टिच्या (Aston Martin) या नवीन कारमध्ये सिग्नेचर क्रोम-स्लॅटेड लार्ज ग्रिल, रुंद एअर डॅम, फ्लश-फिटेड डोअर हँडल, डकटेल स्पॉयलर, डिफ्यूझर, फ्रंट एअर स्प्लिटर, एलईडी हेडलाइट्स, इंडिकेटर-माउंटेड ORVM, इंटिग्रेटेड एलईडी टेललॅम्प्स देण्यात आले आहे.
तसेच यात फोर एक्झॉस्ट टिप्स, हंस स्टाइल ओपनिंग विंडो आणि बंपर-माउंटेड डीआरएल देण्यात आले आहेत. ही कार दिसायला खूपच स्टायलिश आणि आकर्षक आहे.
या कारचे इंजिन खूपच दमदार आहे. कंपनीने यात 4.0L, twin-turbocharged V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 707 hp ची जबरदस्त पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते. हे 9-स्पीड वेट-क्लच गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टमशी देखील जोडलेले आहे.
या कारला 0 ते 97 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 3.1 सेकंद लागतात. ही कार ताशी 310 किलोमीटर वेगाने धावू शकते. यासोबतच या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक अॅक्टिव्ह रोल कंट्रोल (EARC) प्रणाली देखील देण्यात आली आहे.
Aston Martin DBX 707 मध्ये ग्राहकांना एक प्रशस्त लक्झरी केबिन मिळते. ज्यामध्ये क्रोम फिनिशसह स्विचगियर, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, तीन प्रकारची अपहोल्स्ट्री, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, असे फीचर्स यात देण्यात आले आहे.
सेफ्टीसाठी यात अनेक एअरबॅग्जमध्ये क्रॅश सेन्सर, इंजिन इमोबिलायझर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), EBD देण्यात आले आहेत.
Aston Martin भारतात आपल्या नवीन कारची किंमत 4.63 कोटी रुपये ठेवली आहे. ही कंपनीची सर्वात महाग कार आहे. ग्राहक ही कार ऑनलाइन किंवा डीलरशिपवर बुक करू शकतात. ही कार भारतीय बाजारपेठेतील लॅम्बोर्गिनी उरुस आणि फेरारी रोमा सारख्या कारशी स्पर्धा करेल.