MG Gloster Anniversary : एमजी ग्लॉस्टर या गाडीचं भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण
एसयूव्ही (SUV) हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे आणि प्रत्येक नवीन उत्पादनासह या विभागाची लोकप्रियता वाढत चालली आहे हे सर्वांना माहीत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रीमियम एसयूव्ही (Premium SUV) सेगमेंटने टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि फोर्ड एण्डेव्हर (Ford Endeavour) या गाड्यांच्या माध्यमातून भारतात लोकप्रियता प्राप्त केली.
मात्र, एमजी ग्लॉस्टर या गाडीनेही भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण केले आहे आणि बाजारावर आपला ठसा उमटवला आहे. एमजी ग्लॉस्टरमधील आघाडीची 5 फीचर्स खाली दिली आहेत.
एडीएएस : एडीएएस म्हणजे अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम होय. एमजीच्या मते, हा सुरक्षितता उपकरणांचा एक सक्रिय संच आहे आणि ड्रायव्हरला अपघात टाळण्यासाठी किंवा अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी हा संच मदत करतो.
कच्च्या रस्त्यावरील क्षमता : ग्लॉस्टरमध्ये लॅडर-फ्रेम चॅसिस आहे. यामुळे वाहन जमिनीपासून उंच राहते. तसेच यामध्ये प्रगत कार्गो-वाहक क्षमता आहे. या गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक रीअर डिफरन्शिअल लॉकही आहे.
हॅण्ड्स-फ्री स्वयंचलित पार्किंग : मोठ्या आकारमानाच्या गाड्या पार्क करणे ही गजबजलेल्या शहरी भागात तसेच शहराच्या भवतालच्या भागातही डोकेदुखी ठरते. मात्र, एमजी ग्लॉस्टरला ग्राहकांची समस्या लक्षात आली आहे आणि त्यांनी त्यासाठी एक प्रगत फीचर दिले आहे.