Mercedes-Benz : 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि 857 किमी रेंज; मर्सिडीजची नवीन इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च
जर्मनीची लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) भारतात EQS 580 लाँच केले आहे. ज्याची एक्स शोरूम किंमत 1.5 कोटी रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही भारतातील पहिली स्थानिकरित्या असेंबल केलेली लक्झरी इलेक्ट्रिक कार देखील आहे. EQC आणि EQS 53 AMG नंतर इलेक्ट्रिक सब-ब्रँड EQS मध्ये लॉन्च होणारे हे तिसरे मॉडेल आहे.
मर्सिडीज-बेंझ EQS 580 मध्ये 107.8kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. हे दोन इलेक्ट्रिक मोटर्सशी जोडलेले आहे. या कारचे एकत्रित पॉवर आउटपुट 523 bhp आणि 855 Nm टॉर्क आहे. ही कार फक्त 4.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे.
कारची सिस्टीम 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, मर्सिडीजचा दावा आहे की, 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किमीची रेंज मिळते. कंपनीचा दावा आहे की, मर्सिडीज-बेंझ EQS 580 कार एका चार्जवर ARAI-प्रमाणित 857 किमीची रेंज देते.
मर्सिडीज-बेंझ EQS 580 एक टोन्ड-डाउन लूक स्पोर्ट्स करते आणि EQS 53 AMG च्या तुलनेत थोडी लहान आहे. Mercedes-Benz EQS 580 ची लांबी 5,216 मिमी आहे. ही कार 5-स्पोक 20-इंच अलॉय व्हील आणि पाच एक्सट्रनल कलरसह उपलब्ध आहे.
मर्सिडीज-बेंझ EQS 4MATIC MBUX हायपरस्क्रीनसह येते. ज्यामध्ये तीन मोठे हाय-डेफिनिशन डिस्प्ले आहेत. कंपनीने यामध्ये अनेक इंटीरियर कलर ऑप्शन्स दिले आहेत. त्यात बालाओ ब्राउनसह नेवा ग्रे, स्पेस ग्रेसह मॅकियाटो बेज आणि तपकिरी ओपन-पोर वॉलनट वुड सारख्या रंगांचा समावेश आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यात हेड-अप डिस्प्ले, पुढच्या सीटसाठी मसाज फंक्शन, बर्मेस्टर 3D सराउंड सिस्टम, एअर फिल्टरेशन सिस्टम, 9 एअरबॅग्ज आणि बरेच काही समाविष्ट आहे.