Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येत आहे स्टायलिश Jimny, लूकसह फीचरही आहेत दमदार
वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन एसयूव्ही घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच आपली अपग्रेडसह Brezza लाँच केली होती. आता कंपनी आपली नवीन जिमनी (Jimny) मध्यम आकाराची SUV आणण्यासाठी तयारी करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुती 20 जुलै रोजी आपली नवीन कार प्रदर्शित करेल. त्यानंतर ही कार 2022 मध्येच सणासुदीच्या जवळ बाजारात लॉन्च केली जाईल. मारुती सुझुकीला पुन्हा एकदा 50 टक्के भारतीय कार मार्केट कॅप्चर करायचे आहे.
या अपकमिंग एसयूव्हीबद्दल माहिती देताना मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ संचालक (मार्केटिंग आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, कंपनीला त्यांच्या जिमनी एसयूव्हीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मारुती जिमनी 2022 ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती.
दरम्यान ही कार भारतात 5-डोअर प्रकारात लॉन्च करू केली जाऊ शकते. सध्या मारुती सुझुकी जिमनीची अपेक्षित किंमत, स्पेक्स आणि लॉन्च टाइमलाइनवर काम करत आहे.
एका रिपोर्टनुसार, मारुती जिमनीची 5-डोअर प्रकारात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) प्रणालीसह दिली जाऊ शकते. हे उत्सर्जन कमी करण्यासाठी सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानासह दिले जाऊ शकते. एसयूव्हीच्या 5-डोअर प्रकारामध्ये कमी श्रेणीचे ट्रान्सफर गियर आणि 3-लिंक रिजिड एक्सल सस्पेंशन मिळेल. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक युनिट्सचा समावेश असेल. तथापि, भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी ही कार वेगळ्या पद्धतीने ट्यून करू शकते.
ही कार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन आणि पाच डोअर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिमनीची जपानी आवृत्ती 1.5-लिटर VVT पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जी 102 Bhp पॉवर आणि 130 Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.