Mahindra Scorpio Classic Review : दमदार लूक आणि क्लासिक इंजिनसह वाचा महिंद्रा Scorpio Classic चा रिव्ह्यू
दिग्गज कार निर्मात्या कंपन्यांपैकी Scorpio ही एक प्रमुख कंपनी आहे. काही महिन्यांपूर्वीच महिंद्राने Scorpio N कार बाजारात लॉन्च केली होती. आता महिंद्राच्या स्कॉर्पिओ कारमध्ये आणखी काही बदल करण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कॉर्पिओ क्लासिकमध्ये इंजिन, गिअरबॉक्स आणि काही इंटीरियर अपडेट्ससह अनेक बदल आहेत. ही एक साधी फेसलिफ्ट नाही हे यावरून सिद्ध होते. कारचा एक्सटर्नल भागात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत.
महिंद्राच्या नवीन लोगोसह जवळून पाहिल्यास डिझाईनमध्ये काही बदल दिसून येतात. यामध्ये अपडेटेड हेडलॅम्प डिझाईनसह नवीन ग्रिल आणि एक नवीन बंपर देण्यात आला आहे.
काही गोष्टी स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये पूर्वीप्रमाणेच ठेवल्या गेल्या आहेत. यात नवीन 17-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतात, तर मागील बाजूचे क्लासिक एलईडी टेल-लॅम्प देण्यात आले आहेत. महिंद्राने स्कॉर्पिओच्या मुख्य डिझाईनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत.
महिंद्रा स्कॉर्पिओचा इंटर्नल भाग हा जुन्या स्कॉर्पिओसारखाच आहे. मात्र, नवीन लोगोसह यात 9-इंचाची मोठी टचस्क्रीन आहे. बाकी स्कॉर्पिओचा लूक आणि फील तसाच राहतो. दुसर्या रांगेत एक मोठा हेडरूम आहे आणि अगदी कॅप्टन-सीट ले-आउट सीटमध्येही चांगला लेगरूम आहे. आम्ही तिसर्या रांगेतील जंप सीटपेक्षा बेंच सीट्स अधिक सुरक्षित आहे.
लूक किंवा इंटीरियरमध्ये फारसा बदल झालेला नसला तरी ड्रायव्हिंगचा अनुभव हे सर्वात मोठे आकर्षण आहे. नवीन 2.2-लिटर डिझेल इंजिनसह, आणि गिअरबॉक्स अधिक शुद्ध आणि नितळ आहे. याचे 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन वापरण्यास सोपे आहे आणि क्लच अजिबात जड नाही.