Mahindra Bolero Pickup लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...
प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी महिंद्राने (Mahindra) आपले कमर्शियल वाहन Mahindra Bolero Pickup ट्रक लॉन्च केले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Bolero Pickup मध्ये कंपनीने काही अपडेट्स करून हा ट्रक पुन्हा बाजारात उतरवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया लहान आकाराच्या पिकअप ट्रकची एक्स-शोरूम किंमत कंपनीने 7.68 लाख रुपये ठेवली आहे. महिंद्रा या वाहनावर जबरदस्त फायनान्सचा पर्याय देखील देत आहे. ज्या अंतर्गत तुम्ही फक्त 25,000 रुपयांचे डाऊन पेमेंट करून हा ट्रक घरी नेऊ शकता. महिंद्राचा हा पिकअप ट्रक या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे वाहन आहे.
या बोलेरो पिकअपच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये, ग्राहकांना मोठी स्पेस मिळणार आहे. यातील टेलिमॅटिक उपकरणाच्या कनेक्टेड तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही हा ट्रक नेहमी ट्रॅक करू शकता.
या नवीन पिकअपमध्ये शक्तिशाली 3 लीटर इंजिन देण्यात आले आहे. याला नवीन डॅशबोर्ड आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट रेडिएटर ग्रिल मिळते. हा ट्रक 17.2 kmpl चा मायलेज देतो आणि याची पेलोड क्षमता 1300 kg आहे.
महिंद्रा या मिनी पिकअपसाठी 20,000 किलोमीटरच्या सर्व्हिस इंटरव्हलसह 3 वर्षे किंवा 1,00,000 किमी, यापैकी जे आधी असेल त्याची वॉरंटी देखील देत आहे. ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिकअपमध्ये एक जबरदस्त इंजिन आणि पॉवर असून यात उंची-अॅडजस्टेबल सीट, आधुनिक iMAXX तंत्रज्ञान, क्लास-लीड पेलोड क्षमता आणि सेफ्टी लाईट टर्न सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यात अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट नवीन फीचर्सही देण्यात आले आहे.
महिंद्राने या पिकअपमध्ये 3-लिटर m2Di इंजिन दिले आहे. जे 65 bhp पॉवर आणि 195 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात मजबूत R15 टायर बसवले गेले आहेत. जे अधिक लोडिंगला सपोर्ट करतात.