आलिशान लूक आणि दमदार इंजिन, Audi ने लॉन्च केले Q7 SUV चे लिमिटेड एडिशन
जर्मन कार निर्माता ऑडिन इंडियाने लक्झरी SUV Q7 चे लिमिटेड एडिशन लॉन्च केले आहे. या कारमध्ये ऑडीचे प्रसिद्ध क्वाट्रो ऑल व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानचा वापर करण्यात आला आहे. जे या कारच्या चारही चाकांना पॉवर देते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑडीने या SUV मध्ये 3.0L इंजिन दिले आहे. जे 335bhp पॉवर आणि 500Nm टॉर्क जनरेट करते.
ही कार 0 ते 100 किमी प्रतितासचा वेग केवळ 5.9 सेकंदात पकडते.
ही SUV कमाल 250 किमी/तास वेगाने धावू शकते.
याचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक अतिशय आलिशान आणि लक्झरी एसयूव्ही आहे. तसेच यामध्ये अतिशय पॉवरफुल इंजिन देखील वापरण्यात आले आहे.
Q7 या कारचा बाह्य भाग अतिशय खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. या एडिशनसाठी नवीन बॅरिक ब्राऊन रंग वापरण्यात आला आहे.
यासोबतच त्याच्या फ्रंट लूकमध्ये नवीन ग्रिल आणि नवीन सिल ट्रिम जोडण्यात आली आहे. तर त्याची रूपरेषा ही पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे.
ऑडी Q7 SUV मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, आठ एअरबॅग्ज, ओलुफसेन स्टिरिओ सिस्टम, 10.1-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, एअर प्युरिफायर, 19-इंच अलॉय व्हील, मेमरी फंक्शन, 360-डिग्री यांसारखी फीचर्स देण्यात आले आहेत.
कॅमेरा, अॅम्बियंट लाइटिंगच्या 30 शेड्स आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टीमचा समावेश सीटसोबत करण्यात आला आहे.
ऑडीच्या नवीन Q7 SUV ची लिमिटेड एडिशन किंमत 88.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Mercedes-Benz GLS, BMW X7 आणि Volvo XC90 ही कार देशात आधीपासून बाजारात उपलब्ध आहेत.