Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आलिशान लूक, जबरदस्त इंजिन; नवीन Hyundai Tucson भारतात लॉन्च
दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने देशात आपली नवीन Tucson एसयूव्ही लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही फोर्थ जनरेशन Tucson आहे. ज्याची किंमत कंपनीने 27.69 लाख रुपय ठेवली आहे. कंपनीने नवीन Tucson प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
नवीन Hyundai Tucson च्या इंटीरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हॉईस कमांड, अॅम्बियंट साउंड, वॉल मोड, ब्लूलिंक कनेक्टेड तंत्रज्ञान, बोस 8 स्पीकर साउंड सिस्टम, सनरूफ, हँड्स फ्री स्मार्ट पॉवर टेल गेट, ड्रायव्हर पॉवर सीट मेमरी फंक्शन दिले आहे.
ग्राहकांच्या सुविधेसाठी यात वायरलेस फोन चार्जर, रिमोट इंजिन की, सेकंड रो रेक्लाइन फंक्शन, मोठा बूट स्पेस, पॅसेंजर सीट वॉक-इन डिव्हाइस, सेकंड रो फोल्डिंग सुविधा, 60:40 स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज, ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Hyundai Tucson मध्ये 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 156 bhp पॉवर आणि 192 न्यूटन मीटर टॉर्क जनरते करते. यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन पर्याय ही आहे. जे 186 bhp पॉवर आणि 416 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो.