नवीन स्टाईल, अपडेट फीचर्ससह Kawasaki Ninja 300 लॉन्च; पाहा फोटो
Kawasaki ने आपल्या लोकप्रिय स्पोर्ट बाईक Kawasaki Ninja 300 चे अपडेट व्हेरिएंट भारतात लॉन्च केले आहे. कावासाकी निन्जा 300 (2022) एडिशन या नावाने ही बाईक सादर करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन Kawasaki Ninja 300 च्या डिझाईनमध्ये फारसा बदल झालेला नाही, पण ही बाईक नवीन कलर पॅटर्न आणि नवीन बॉडी ग्राफिक्ससह सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक आधीच्या तुलनेत काही प्रमाणात वेगळी दिसते.
Kawasaki Ninja 300 (2022) एडिशन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे रंग पर्याय आहेत - लाइम ग्रीन, कँडी ग्रीन आणि इबोनी. लाइम ग्रीन आणि कँडी लाइम ग्रीन हे ड्युअल टोन रंग आहेत.
साइड पॅनल्स आणि इंधन टाकीवर देखील अपडेट केलेले ग्राफिक्स उपलब्ध आहेत. इबोनी (डीप ब्लॅक कलर) एक मोनो-टोन शेड आहे आणि बॉडी पॅनलवर हिरव्या आणि राखाडी पट्ट्यांसह येते.
Kawasaki Ninja 300 (2022) ऍडिशनची किंमत 3.37 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. कंपनीने याच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. ही Kawasaki ची सर्वात परवडणारी मोटरसायकल आहे, जी TVS Apache RR 310, BMW G 310 R, Honda CB350 यांसारख्या बाइक्सशी थेट स्पर्धा करेल, असे बोलले जात आहे.
परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर, कावासाकी निन्जा 300 2022 एडिशन 296cc समांतर-ट्विन, लिक्विड-कूल्ड 4-स्ट्रोक इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 11,000 RPM वर 38.4 hp ची पॉवर जनरेट करते. हे 10,000 RPM वर 26.1 Nm पीक टॉर्क देखील तयार करते. ही बाईक 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील देण्यात आले आहे.