काय लूक, काय स्पीड, समदं कसं एकदम भारी! Lamborghini Huracan Technica भारतात लॉन्च
सुपरकार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाने (Lamborghini India) आपली नवीन लॅम्बोर्गिनी Huracan Technica भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने या वर्षी एप्रिलमध्ये V10 स्पोर्ट्स कारचे नवीन व्हर्जन सादर केली होती.
Huracan STO आणि Huracan Evo RWD मध्ये Huracan Technica ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कारची किंमत 4 कोटी रुपये इतकी ठेवली आहे.
नवीन Lamborghini Huracan Technica कॉस्मेटिक अपडेट्स आणि फीचर अॅडिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. मात्र याच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ही कार लॅम्बोर्गिनी Huracan Technica कंपनीच्या मोठ्या व्हर्जनपासून प्रेरित आहे.
2022 Lamborghini Huracan Technica मध्ये 5.2-लीटर नॅचरल एस्पिरेटेड V10 इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 640 Bhp ची पॉवर आणि 565 Nm कमाल टॉर्क जनरेट करते.
हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास आणि 9.1 सेकंदात 200 किमी प्रतितास वेग मिळवू शकते. तसेच या कारचा कमाल वेग ताशी 325 किमी सांगितला जात आहे.
नवीन 2022 Lamborghini Huracan Technica चे वजन 1,379 kg आहे.
या कारमधील वजन कमी करण्यासाठी कंपनीने याच्या पुढील बोनेट आणि मागील हूडवर कार्बन फायबरचा पुरेसा वापर केला आहे.
याबाबत बोलताना लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल म्हणाले, “स्थानिक बाजारपेठेत वेगाने नवीन मॉडेल आणणे हा भारतातील आमच्या वाढीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. आज भारतात लॅम्बोर्गिनी Huracan Technica सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.''