Diwali 2022: दिवाळीत 'या' कारवर मिळत आहे जबरदस्त सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Maruti Celerio: या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 5.25 लाख रुपये आहे. जी याच्या टॉप स्पेस मॉडेलसाठी 7 लाख रुपयांपर्यंत जाते. यावर 59,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaruti Alto K10: मारुतीच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या या कारची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख ते 5.83 लाख रुपये आहे. या कारवर 39,000 रुपयांची सवलत उपलब्ध आहे.
Maruti Swift: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे, तर तिचे टॉप मॉडेल 8.71 लाख रुपये आहे. या कारच्या खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.
Maruti Ignis: या कारची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.72 लाख रुपयांपर्यंत जाते. मारुती इग्निसच्या खरेदीवर या महिन्यात 30,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
Maruti Wagon R: मारुती वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5.48 लाख ते 7.08 लाख रुपये आहे. या कारवर 40,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.
Renault Kwid: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे जी 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.
Renault Triber: Renault Triber MPV ची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारच्या खरेदीवर 50,000 डिस्काउंट ऑफर उपलब्ध आहे.
Honda City: या कारची एक्स-शोरूम किंमत 11.57 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.52 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारच्या खरेदीवर कोणीही 37,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतो.
Tata Safari & Harrier: या दोन्ही कारवर ग्राहक या महिन्यात 45,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
हॅरियरची एक्स-शोरूम किंमत 14.70 लाख ते 22.20 लाख रुपये आणि सफारीची एक्स-शोरूम किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे.
Hyundai Grand i10 Nios आणि Aura: या दोन्ही कारवर 33,000 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते.
Grand i10 Nios बाजारात 5.43 लाख ते 8.45 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. तर Aura ची एक्स-शोरूम किंमत 6.09 लाख ते 8.87 लाख रुपये आहे.