125 सेगमेंटमध्ये 'या' स्कूटर आहेत बेस्ट, कमी किंमतीत मिळणार बेस्ट फीचर्स
या यादीतील पहिली स्कूटर आहे Suzuki Access 125. यामध्ये फॅमिली स्कूटरला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये मिळतात. ही स्कूटर आता आणखी फीचर्स आणि मायलेजसह BS6 अपडेटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात 124cc सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे इंजिन 6,750 rpm वर 8.6 bhp आणि 5,500 rpm वर 10 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. याची किंमत 75,024 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
यादीतील दुसरी स्कूटर Honda ActiVA 125 आहे. ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. यातील इंजिन फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानासह येते. यात 124cc सिंगल सिलेंडर क्षमतेचे एअर-कूल्ड इंजिन आहे.
ड्रायव्हिंग आरामदायी करण्यासाठी याच्या इंजिनमध्ये कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) वापरण्यात आले आहे. याचे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, याची किंमत 75,761 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
या यादीतील तिसरी स्कूटर TVS NTORQ 125 आहे. ही खूप चांगल्या फीचर्ससह येते. सर्वात महत्त्वाच्या फीचर्समध्ये याच्या ड्युअल-स्क्रीन सेटअपचा समावेश आहे, ज्यामध्ये एलसीडी आणि टीएफटी स्क्रीन आहे. यासोबतच कंपनीची पेटंट TVS SmartXonnect सिस्टीम देखील यामध्ये आहे.
जी ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट करता येते. SmartXTalk आणि SmartXTrack सारखे फीचर्सही स्कूटरमध्ये पाहायला मिळतील. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, याची किंमत 82,592 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.