होंडाची 'ही' हायब्रिड कार करणार धमाल, देते सर्वाधिक मायलेज
जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडा कार इंडियाने भारतात आपली नवीन Honda City e: HEV Hybrid सादर केली आहे. होंडा सिटी हायब्रिड ही देशातील सर्वाधिक मायलेज देणारी मिड-साईझ सेडान बनली आहे. जी एक लिटर पेट्रोलमध्ये 26.5 kmpl मायलेज देते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीने आपल्या या नवीन कारची बुकिंग देखील सुरू केली आहे. ग्राहक ही कार कंपनीच्या अधिकृत डिलरशिपकडून बुक करू शकतात.
तसेच ग्राहक कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊनही ही कार बुक करू शकतात. मात्र अद्याप कंपनीने या कारची किंमत किती असेल, हे जाहीर केलेलं नाही.
भारतीय बाजारात होंडा सिटी हायब्रिडची स्पर्धा Maruti Suzuki Ciaz, Hyundai Verna आणि Skoda Slavia शी होईल. असं असलं तरी सिटी हायब्रीडचा थेट प्रतिस्पर्धी कोणीही नाही. कारण हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली या सेगमेंटमधली ही पहिलीच कार आहे.
Honda City e-HEV Hybrid मध्ये 1.5-लिटर चार-सिलेंडर इंजिनसह, दोन इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. यातील एक मोटर इलेक्ट्रिक निर्मितीचे काम करते. दुसरी मोटर हीइलेक्ट्रिसिटी परत वाहनापर्यंत पोहोचवते. या प्रकारच्या इंजिन तंत्रज्ञानाला हायब्रिड इंजिन म्हणतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, कारचे मायलेज इतर कारच्या तुलनेत अधिक वाढवते. याआधी मारुती सियाझ ही काही प्रमाणात ब्रिज तंत्रज्ञानासह लॉन्च करण्यात आली होती. मात्र Honda City e-HEV ही पूर्ण हायब्रिड कार आहे.
सिटी हायब्रिडला Honda Connect आणि स्मार्टवॉच इंटिग्रेशनसह 8-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. या कारच्या केबिनभोवती 8 स्पीकर देखील आहेत. ड्रायव्हर डिस्प्ले पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्यात ऑटो लॉक सिस्टिम आहे.