Harley Davidson X440 : या Harley बाईकला मिळतेय ग्राहकांची पसंती; 25,000 हून अधिक झाली बुकिंग
Harley Davidson X440: Harley-Davidson X440 बाईक हीरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार करण्यात आली आहे. कंपनीने सध्या काही काळ बुकिंग थांबवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarley-Davidson ने नुकत्याच लाँच झालेल्या X440 बाईकसाठी बुकिंग बंद केली आहे. लॉन्च झाल्यापासून, कंपनीला X440 साठी आतापर्यंत 25,597 बुकिंग मिळाले आहेत. हार्ले डीलर्सनी अधिकृतपणे 4 जुलैपासून 5,000 रुपयांमध्ये बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
Hero MotoCorp ने म्हटले आहे की, Harley X440 च्या टेस्टिंग राईड्स 1 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि वितरण ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. Hero MotoCorp नीमराना, राजस्थान येथे Harley-Davidson X440 चे उत्पादन करेल. बुकिंगच्या तारखांनुसार डिलिव्हरी प्राधान्याने केली जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे.
अधिकृत निवेदनात, कंपनीने सांगितले की, प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमती सुधारित केल्या गेल्या आहेत. डेनिम, विविड आणि एस ट्रिम्सची किंमत आता अनुक्रमे 2,39,500, 2,59,500 आणि 2,79,500 रुपये असेल. बुकिंग विंडो पुन्हा सुरु झाल्यावर नवीन किंमती प्रस्तावित केल्या जातील.
Harley-Davidson X440 ला एअर-/ऑइल-कूल्ड, 440cc, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते, जे 6,000rpm वर 27hp आणि 4,000rpm वर 38Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
Harley-Davidson X440 ची स्पर्धा Royal Enfields आणि अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Triumph Speed 400 शी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड 400 लाही जवळपास 20,000 बुकिंग मिळाले आहेत.