Rare 1908 Harley-Davidson Bike: 'ही' आहे जगातली सर्वात महागडी व्हिंटेज बाईक, लिलावात तब्बल इतक्या कोटींना विकली गेली
Rare 1908 Harley-Davidson Bike: हार्ले डेव्हिडसन हे फक्त नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर एक सुंदर आणि दमदार बाईकचं चित्र उभं राहतं. ही फक्त बाईक नाही तर अनेकांचं स्वप्न आहे. हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) बाईक या जगभरात प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी ही बाईक जगभरात ओळखली जाते. मात्र ही बाईक खरेदी करणं, हे सर्वांना परवडण्यासारखं नाही. आज जशी ही बाईक प्रसिद्ध आहे, तशीच ही 100 वर्षांपूर्वी देखील जगभरात प्रसिद्ध होती.
नुकताच हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक 1908 मध्ये हार्ले डेव्हिडसनने (Harley-Davidson) बनवली होती, जिचा आता लिलाव करण्यात आला आहे. या ही 115 वर्ष जुनी बाईक तब्बल 935,000 डॉलर्समध्ये विकली गेली आहे.
भारतीय चलनात ही रकम जवळपास 5.91 कोटी रुपये इतकी होते. यासोबतच लिलावात विकली गेलेली ही जगभरातील सर्वात महागडी बाईक ठरली आहे.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, 28 जानेवारी रोजी लास वेगासमधील मॅकम ऑक्शन्सने लिलाव आयोजित केला होता.
मेकम ऑक्शन्सने स्ट्रॅप टँक (Harley-Davidson Strap Tank) मोटरसायकलचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता, जिथे त्याला 8,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि 800 च्या जवळपास कमेंट्स मिळाले आहेत.
फॉक्स बिझनेसच्या रिपोर्टनुसार, या बाईकच्या मॉडेलचे नाव 'स्ट्रॅप टँक' Harley-Davidson Strap Tank) होते. याच्या इंधनाच्या टाक्या फ्रेमला निकेल-प्लेटेड स्टीलच्या पट्ट्यांसह जोडलेल्या होत्या.