दिसायला शानदार, फीचर्स दमदार; Hyundai Venue Facelift भारतात लॉन्च
नवीन 2022 Hyundai Venue Facelift अखेर गुरुवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. अपडेटेड मॉडेल लाइनअप 6 ट्रिमसह 10 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यात E, S, S+, S (O), SX आणि SX (O) प्रकाराचा समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन 2022 Hyundai Venue Facelift ची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 9.99 लाख रुपयांपर्यंत जाते. या किमतीत नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट एसयूव्ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील लोकप्रिय वाहनांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
या सेगमेंटमध्ये Tata Nexon SUV भारतात विकल्या जाणार्या सर्व SUV मध्ये आघाडीवर आहे. असं असलं तरी आगामी 2022 मारुती सुझुकी विटारा ब्रेझा फेसलिफ्ट SUV या सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करणार आहे.
1.0 लिटर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टर्बो पेट्रोल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. नवीन Venue डिझेल 9.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम दिल्ली आहेत. या प्रास्ताविक किमती असल्याचे कंपनीने म्हटले आहे. म्हणजेच भविष्यात त्यांची किंमत वाढू शकते. 2022 Hyundai Venue ला तीन अॅक्सेसरीज पॅक मिळतील - बेसिक (Basic ), अॅडव्हान्स (Advance ), सुप्रीम (Supreme ), ज्या अंतर्गत 47 अॅक्सेसरीज उपलब्ध असतील.
नवीन 2022 Hyundai Venue SUV खरेदी करू इच्छिणारे ग्राहक 21,000 रुपये टोकन रक्कम भरून ऑनलाइन किंवा अधिकृत Hyundai डीलरशिपवर ही कार बुक करू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, काही प्रकारांसाठी प्रतीक्षा कालावधी आधीच 16 आठवड्यांपर्यंत वाढला आहे.
Hyundai ने नवीन Venue च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 1.0-लिटर टर्बो GDi आणि 1.2-लिटर MPi कप्पा पेट्रोल इंजिन पर्यायांसह, हे पूर्वीप्रमाणेच 1.5-लीटर CRDi डिझेल इंजिनसह ऑफर केले जाईल. ट्रान्समिशन पर्याय 6-स्पीड मॅन्युअल किंवा IMT तसेच DCT गिअरबॉक्स असेच राहतील.