Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo: सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स ही देशात सर्वात आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक टाटाच्या इलेक्ट्रिक कार विकल्या जातात. अशातच आज कंपनीने आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लॉन्च केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कारची भारतीय वाहन क्षेत्रात मोठी चर्चा आहे. अखेर ही कार भारतात लॉन्च झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख (cheapest electric car) रुपये आहे. तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख (Tata Tiago Ev Price) रुपये आहे. टाटा पुढील वर्षी जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
Tiago EV ही नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. जी Tigor EV सारखीच पॉवरट्रेनसह लॉन्च करण्यात आली आहे.
नवीन Tiago EV चांगली रेंज आणि परफॉर्मन्ससाठी Ziptron EV आर्किटेक्चर देण्यात आले आहे.
Tiago EV मध्ये 24kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आले आहे. जे 315 किमी पर्यंतची रेंज देते. हे बॅटरी पॅक याच्या XT, XZ +, XZ + Tech LUX, प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
यात लहान 19.2 kWh बॅटरी पॅकचा पर्याय देखील मिळतो, जो 250km ची रेंज देण्यास सक्षम आहे. हा बॅटरी पॅक त्याच्या XE आणि XT प्रकारांमध्ये देण्यात आला आहे.
यामध्ये अनेक Regen मोड आहेत, जे सिंगल पेडल ड्रायव्हिंगमध्ये मदत करतात आणि अधिक रेंज देखील देतात.
पारंपरिक चार्जिंग प्लग पॉइंटसह एसी चार्जर आणि डीसी फास्ट चार्जरच्या मदतीनेही ही कार चार्ज करता येते.
Tata चा दावा आहे की 7.2kW AC चार्जरने कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 तास 36 मिनिटे लागतात.
डिझाइननुसार सर्व बाजूंनी निळ्या रंगाचे हायलाइट्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे डिझाईनला वेगळा लूक मिळतो.