क्लासिक लूक, जबरदस्त रेंज; नवीन Atum Vader इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च

Atum Vader

1/6
हैदराबाद येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Atumobile ने भारतात आपली इलेक्ट्रिक बाईक Atum Vader लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 1 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.
2/6
कंपनीच्या म्हणण्यानुसार, बाईक अधिकृत वेबसाइटवरून 1,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. ही बाईकची प्रारंभिक किंमत आहे, जी केवळ 1,000 युनिट्सच्या विक्रीपुरती मर्यादित आहे. यानंतर बाईकची किंमत वाढू शकते.
3/6
Atumobile दरवर्षी 25,000 युनिट्सचे उत्पादन करण्याचे लक्ष ठेवत आहे. काही वर्षांत ते 3 लाख युनिट्सपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष आहे. Atum Vader मध्ये 2.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 100 किमीपर्यंत धावते, असा दावा कंपनीने केला आहे. याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 2-3 तास लागतील.
4/6
कंपनीचा दावा आहे की, अतूट Vader ही देशातील पहिली हाय-स्पीड इलेक्ट्रिक कॅफे रेसर बाईक आहे. जी भारतात डिझाइन केली असून येथेच तयार केली जात आहे. ही बाईक मजबूत ट्युब्युलर फ्रेमवर बांधली गेली आहे आणि सर्व प्रकाश LEDs मध्ये मिळतात.
5/6
मिळालेल्या माहितीनुसार, या ई-बाईकची टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास आहे. या बाईकमध्ये क्लच आणि लेग ब्रेक नसून हिला थांबवण्यासाठी हँड ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. फुल-एलसीडी डिजिटल स्क्रीन, दोन डिस्क ब्रेक, अँटी थेफ्ट अलार्म, जिओ-फेन्सिंग, ब्लूटूथ, रिमोट लॉक यासारख्या नवीन फीचर्सचा यात समावेश करण्यात आला आहे.
6/6
कंपनी या बाईकच्या निर्मितीमध्ये स्थानिक कारखान्यांमध्ये बनवलेल्या 90 टक्के उपकरणांचा वापर करणार आहे. Atum Vader ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक बाईक आहे. यापूर्वी कंपनीने Atum 1.0 e-bike लाँच केली होती आणि कंपनीला आधीच 1,000 युनिट्ससाठी बुकिंग प्राप्त झाली आहे.
Sponsored Links by Taboola