Cars With Massage Seats : गाडी असावी तर अशी! 'या' गाडीत बसताच क्षणात थकवा दूर होईल
तुमची जीवनशैली अशीच व्यस्त असेल तर काही गाड्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार थकवा दूर करण्याचं देखील काम करतात. या कारच्या सीट मसाज चेअरचंही काम करतात.
एमजी ग्लोस्टर कारमध्ये मसाज सीटचा पर्याय आहे. ही मसाज सीट ड्रायव्हर सीटवर उपलब्ध आहे. यामुळे गाडी चालवण्यासोबतच तुम्हाला शरीराचा थकवाही दूर करता येईल. या प्रीमियम कारची एक्स-शोरूम किंमत 38.08 लाख रुपयांपासून सुरू होते.
यामधील दुसरी कार आहे Volvo S90 लक्झरी कार आहे. या कारच्या पुढच्या सीटवर मसाजची सुविधा उपलब्ध आहे, त्याशिवाय पाठीचा थकवा दूर करण्यासाठी 10 मसाज पॉइंट्सचीही सुविधा आहे.
ऑडी ए8 एल कारच्या सर्व सीट मसाज फीचरसह येतात. 1.29 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किंमतीसह तुम्ही ही कार खरेदी करु शकता.
तिसऱ्या क्रमांकावर ऑडी ए8 एल खरेदी करता येईल. ही एक लक्झरी कार आहे, जी प्रीमियम केबिनसह येते.
मर्सिडीज-बेंझ EQS चे नाव देखील या यादीत आहे. या लक्झरी कारच्या सीट्स मोकळी स्पेस आणि मसाज सुविधेसह येतात. यासाठी तुम्हाला 1.55 कोटी रुपये एक्स-शोरूम किंमत मोजावी लागेल.
या यादीतील पुढचं नाव BMW 7 सीरीज लक्झरी कार आहे. या कारच्या केबिनमधील सीट्स हवेशीर, हीटिंग आणि मसाज वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.
BMW 7 सीरीज लक्झरी कारने प्रवास करताना तुम्हाला मसाज सीटवर विश्रांतीही करता येते. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.70 कोटी रुपये एक्स-शोरूम खर्च करावे लागतील.