Car Insurance : कार विमा खरेदी करताय? 'या 'टिप्सने तुमचा प्रीमियम होईल कमी!
प्रत्येक कार मालकाचा कमी प्रीमियम दरात चांगला विमा खरेदी करण्याकडे कटाक्ष असतो. त्यासाठी काही टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही एका वर्षात विमा पॉलिसी क्लेम केला नाही तर तुम्हाला No Claim Bonus चा फायदा मिळू शकतो.
पहिल्या वर्षी तुम्हाला 20 टक्क्यांपर्यंत हा फायदा मिळू शकतो. जर तुम्ही दरवर्षी 5000 रुपयांचा प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला No Claim Bonus म्हणून 1000 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
ज्या व्यक्ती आपल्या कारचा वापर कमी प्रमाणात करतात त्यांच्यासाठी Pay As You Drive हा विमा चांगला ठरू शकतो.
यामुळे तुम्हाला कमी प्रीमियम द्यावा लागू शकतो.
Pay As You Drive या प्रकाराचा विमा तुम्ही किती किलोमीटर कार चालवता यावर अवलंबून आहे.
ज्या कार 15 हजार किलोमीटरपेक्षा कमी धावल्या आहेत. त्यांना याचा फायदा मिळतो.
कोणताही विमा खरेदी केल्यानंतर त्याची वैध मुदत तारीख पाहून घ्या.
वेळेत विमा नुतनीकरण न केल्यास तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागू शकतो.
त्यामुळे सात दिवस आधी विमा नुतनीकरण करून घ्यावे.
कार विमा खरेदी केल्यानंतर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर विमा दावा करणे टाळावे. कमी खर्च असणारे विमा दावा केल्याने तुम्हाला No Claim Bonus चा लाभ मिळणार नाही.