Harley Davidson ने भारतात सादर केली नवीन Nightster बाईक, पाहा फोटो
1
1/6
Harley-Davidson ने भारतात आपली नवीन 2022 Nightster सादर केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर नवीन हार्ले-डेव्हिडसन नाईटस्टर डिस्प्ले करण्यात आली आहे. मात्र कंपनीने अद्याप याच्या लॉन्चची तारीख जाहीर केली नाही.
2/6
Harley-Davidson Nightster मध्ये 975cc लिक्विड-कूल्ड 60-डिग्री व्ही-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. ज्यात स्लिप मेकॅनिकल वेट क्लचसह सिक्स-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
3/6
Nightster चे इंजिन 7,500 rpm वर 90 bhp पॉवर आणि 5,000 rpm वर 95 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. या बाईकमध्ये ग्राहकांना रेन, रोड आणि स्पोर्ट असे तीन वेगवेगळे राइड मोड मिळतील.
4/6
नवीन Harley-Davidson Nightster तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल - विविड ब्लॅक, गनशिप ग्रे आणि रेडलाइन रेड.
5/6
बाईकमध्ये 19-इंचाचा फ्रंट आणि 16-इंचाचा मागील कास्ट अॅल्युमिनियम अलॉय व्हील मिळेल. समोर 320 मिमी डिस्कसह चार-पिस्टन कॅलिपर आणि मागील बाजूस 260 मिमी डिस्कसह फ्लोटिंग सिंगल-पिस्टन कॅलिपर असेल.
6/6
या बाईकमध्ये ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देखील मिळेल. बाईकला पुढील आणि मागील फेंडर्स, एक गोल हेडलॅम्प आणि एक सोलो बॉबर सीट मिळेल.
Published at : 15 Apr 2022 10:36 PM (IST)