Best Bikes For Rainy Season : पावसाळ्यात बाईक शौकिनांच्या आवडत्या बाईक कोणत्या? जाणून घ्या...

Best Bikes for Rainy Season

1/9
पावसाळ्यात रस्ते धोकादायक बनतात. पण, या मोसमात बाईख राईडची मजा घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
2/9
योग्य काळजी घेऊन तुम्हीही पावसात बाईक राईडचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात बाईक शौकिनांच्या आवडत्या बाईक कोणत्या? जाणून घ्या...
3/9
बाईक शौकिनांच्या यादीत पहिलं नाव आहे, सुझुकी GSXR 1000. ही सुपरस्पोर्ट सेगमेंट बाईक आहे.
4/9
सुझुकी GSXR बाईक शक्तिशाली 1000cc इंजिनसह येते आणि तिचं वजन सुमारे 202 किलो आहे. यामध्ये सुरक्षिततेसाठी ब्रेम्बो टी-ड्राइव्ह 320 मिमी एबीएस ब्रेकिंग सिस्टम आहे.
5/9
दुसरी बाईक Kawasaki Ninja 650 ABS आहे. ही एक स्पोर्ट्स बाईक असून हीचं वजन सुमारे 195 किलो आहे. या बाइकमध्ये 649cc इंजिन आहे. या बाईकमध्ये दिलेली निसिन ड्युअल कॅलिपर पेटल डिस्क ABS ब्रेकिंग सिस्टीम उत्तम काम करते.
6/9
तिसऱ्या क्रमांकावर Honda GL1800 Goldwing बाईक आहे, जी प्रीमियम क्रूझर सेगमेंट बाईक आहे. याचे वजन सुमारे 356 किलोग्रॅम आहे.
7/9
Honda GL1800 Goldwing बाइक 1833cc पॉवर इंजिनसह येते. यामध्ये असलेले ड्युअल कंबाइंड एबीएस पावसाळ्यात चांगलं संरक्षण देतं.
8/9
या यादीत चौथी बाईक BMW R आहे. ही एक एडव्हेंचर सेगमेंट बाईक आहे, याचं वजन सुमारे 229 किलो आहे. यामध्ये 1170cc इंजिन आहे. कंट्रोलिंग सुधारण्यासाठी यात ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे.
9/9
पाचवी बाईक Ducati Multistrada 1260 आहे. 1262cc इंजिन असणाऱ्या या बाइकचं वजन सुमारे 224 किलो आहे . यामध्ये, 4-पिस्टन मोनोब्लॉक रेडियल कॅलिपर ABS ब्रेकिंग सिस्टिम आहे.
Sponsored Links by Taboola