Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bajaj Bike : ट्रायम्फ- बजाजने लाँच केल्या सर्वात स्वस्त बाईक्स , पाहा किंमती
कट्टर प्रतिस्पर्धी Harley Davidson plus Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी Triumph ने Speed 400 आणि Scrambler 400 X भारतात लाँच केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रिम्फ 400 ही बाईक लाँच झालेली असून या बाईकची किंमत 2.33 असून पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी ही बाईक 2.23 लाखांना मिळणार आहे.
तर Scrambler 400X ही बाईक देखील येत्या आॅक्टोबरमध्ये भारतात लाँच होणार आहे.
दोन्ही बाईक बजाजने भारतात उत्पादित केल्या आहेत आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. जिथे Harley Davidson X440 देखील आहे.
बाईकमध्ये नवीन सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, ज्याला ट्रायम्फ टीआर-सीरीज इंजिन म्हटले जात आहे.
या माॅडेल्सना 43MM अपसाईड-डाउन फ्रंट आणि मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनो शाॅक अॅब्जोबर्स देण्यात आले आहेत.
तुम्हाला या बाइक्समध्ये एलईडी हेडलॅम्प्स पाहायला मिळतील, वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, एलसीडी अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इतर अनेक फिचर्स या मॉडेल्समध्ये उपलब्ध असतील.
400 सीसी सेगमेंटच्या या बाइक्स हायब्रिड स्पाइन/परिमित फ्रेमवर तयार केल्या गेल्या आहेत. या मॉडेल्सना 43MM अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस गॅस चार्ज केलेले मोनो शॉक अब्जोबर्स देण्यात आले आहे. सेफ्टीसाठी ड्युअल चॅनल एबीएससह डिस्क ब्रेक देण्यात आले
बजाज आणि ट्रायम्फ यांच्या पार्टनरशिप लाँच केलेली ही पहिली बाईक आहे, या मॉडेल्समध्ये नवीन टीआर सीरीज 398.15 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड 4 वाल्व डीओएचसी इंजिन देण्यात आले आहे जे 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.
इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बाईकमध्ये राइड-बाय-वायर, राइडिंग मोड, स्लिपर क्लच आणि अॅडजस्टेबल लीव्हर्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे.या दोनही बाईक सध्या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध झाली आहे. ट्रायम्फ स्पीड 400 देखील KTM ड्यूक 390 पेक्षा स्वस्त आहे तर नवीन Harley Davidson X440 रु. 2.29 लाख ते रु. 2.6 लाख किंमतीत ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.