जबरदस्त फीचर्स, पॉवरफुल इंजिन, या आहेत देशातील टॉप क्रूझर बाईक्स
Royal Enfield Classic 350: रॉयल एनफिल्डची ही क्रूझर बाईक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाईकचे डिझाईन खास तरुणांना लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिप मीटर, स्पीडोमीटर, इंधन गेज यांसारखे उत्कृष्ट फीचर्स मिळतात. कमी किमतीत सर्वात प्रसिद्ध क्रूझर बाईक्समध्ये याची गणना केली जाते. याची प्रारंभिक किंमत 1.90 लाख रुपयांपासून सुरू होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHonda CB350RS: जपानी ब्रँड Honda ची Honda CB350RS ही बाईक कमी कर्ब वेट आणि मोठ्या टाकीसह येते. यात 15-लिटर इंधन टाकीची सुविधा मिळते. ज्याचे मायलेज 35 kmpm आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे.
Bajaj Avenger Cruise 220: ही क्रूझर सीरिजची देशातील सर्वात स्वस्त बाईक आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. क्रूझरच्या दृष्टीने अधिक मायलेज देणारी ही किफायतशीर बाईक आहे. याची सीट पॅड केलेली आणि उच्च दर्जाची Honda Dream 100 सारखी आहे. इंधन कार्यक्षम असण्याव्यतिरिक्त, इंजिनची गुणवत्ता आणि कार्यक्षमता देखील जबरदस्त आहे.
Yezdi Adventure: येझदी अॅडव्हेंचर बाईक 334cc सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक लिक्विड कूल्ड DOHC इंजिनसह येते. जी 30.2 PS पॉवर आणि 29.9 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. यात एलईडी हेडलाइट युनिट, एलसीडी डिजिटल डिस्प्ले आहे. यासोबतच यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ब्लूटूथद्वारे कंपनीच्या अॅपशी कनेक्टिव्हिटीची सुविधाही मिळते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.15 रुपये आहे.
Jawa Perak: जावा बाईकमध्ये 334cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 30.4bhp ची पॉवर आणि 31Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 6 गिअर्सची सुविधा आहे. जावाच्या बाईक्स देशात खूप प्रसिद्ध आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.11 लाख रुपये आहे. Jawa चे देशभरात जवळपास 100 डीलरशिप आहेत.