Skoda Slavia भारतात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...
स्कोडा ऑटो इंडियाने आज नवी कोरी स्लाविया 1.0 टीएसआय सेडान भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या या नवीन गाडीची प्रारंभिक किंमत 10.69 लाख रुपये इतकी ठेवली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच्या 1.5-लेटर लिटर टीएलआय व्हेरिएंटच्या किमतीचा खुलासा कंपनी 3 मार्च रोजी करणार आहे. भारतीय बाजारात या कारची स्पर्धा Honda City आणि Maruti Ciaz कारशी होईल.
खास भारतासाठी तयार करण्यात आलेल्या MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीने ही कार अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल या तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे.
नवीन स्कोडा स्लावियामध्ये 16-इंच अलॉय व्हील, लांब व्हील बेस, व्हर्टिकल क्रोम फ्रंट ग्रिल, एल-आकाराचे हेडलाइट्स आणि रुंद एअर इनलेटसह बंपर सारखे फीचर्स देण्यात आले आहे. तसेच यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि ऑटो हेडलॅम्प देण्यात आले आहे.
कंपनीने यात 1.0 लिटर ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 पीएस पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे.
दुसऱ्या पर्यायामध्ये 1.5 लीटर 4 सिलेंडर TSI इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 150 पीएस पॉवर 250 एनएम टॉर्क जनरेट करेल.