कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स, Hero ची Adventure बाईक लॉन्च
Hero MotoCorp ने ऑफरोडींगसाठी बेस्ट असलेल्या आपल्या Xpulse 200 4V चा Rally Edition लॉन्च केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन Hero Xpulse 200 4V Rally Edition बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.52 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
नवीन Xpulse 200 4V Rally Edition बाईक खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक 22 जुलै रोजी दुपारी 12 ते 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाइटवर ही बाईक ऑनलाइन बुक करू शकतात.
Hero Xpulse 200 4V Rally Edition मध्ये 199.6cc, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे.
हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात DRL सह एलईडी हेडलॅम्प, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी फीचर्सही आहेत.
याच्या सीटची उंची 885 मिमी, हँडलबार राइसर 40 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 270 मिमी (स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 50 मिमी जास्त), 1426 मिमी (स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 26 मिमी जास्त) आहे.