Auto Expo 2023: मुंबई ते अमरावती एका चार्जमध्ये गाठणार; चिनी कंपनीने ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जबरदस्त इलेक्ट्रिक कार
Auto Expo 2023: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स (BYD) ने नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली सेडान BYD Seal सादर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBYD ही इलेक्ट्रिक सेडान भारतात 2023 च्या चौथ्या तिमाहीत लॉन्च करणार. तर याची डिलिव्हरी तेव्हाच सुरु करण्यात येईल.
BYD Seal ही कंपनीची भारतातील तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे.
ऑटो एक्स्पोमध्ये आकर्षक फॉरेस्ट ग्रीन कलरमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. BYD Seal आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टेस्ला मॉडेल 3 शी स्पर्धा करते.
ही इलेक्ट्रिक सेडानची लांबी 4,800 मिमी, रुंदी 1875 मिमी आणि उंची 1460 मिमी आहे. तुलनेत टेस्ला मॉडेल 3 लांबी, रुंदी आणि उंचीने लहान आहे.
याव्यतिरिक्त BYD सीलचा व्हीलबेस देखील मॉडेल 3 च्या व्हीलबेसपेक्षा 45 मिमी लांब आहे. दोन्ही कारची तुलना करता सील ही टेस्ला मॉडेल 3 पेक्षा मोठी कार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सील दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, एक 61.4 kWh आणि 82.5 kWh युनिट.
चायना लाइट-ड्युटी व्हेईकल टेस्ट सायकलनुसार (CLTC-Sils) याच्या लहान बॅटरी मॉडेलची रेंज 550km आहे, तर मोठी बॅटरी एका चार्जवर (CLTC नुसार) 700km ची रेंज देऊ शकते.
इतर सर्व BYD इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणे सील देखील ब्रँडच्या ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.